गाव तिथे निसर्गोपचार चालवून नागरिकांना खरे आरोग्य द्या !!!

आपल्या दैनंदिन जीवनात आपण शुद्ध आहार ,पाणी,यांच्या प्रयोगाबरोबच सकाळी उठून शुद्ध हवा हि मिळतेच मात्र हे दैनंदिन जीवनातील सहज प्रयोग असलायने त्यावर कोणी काही खास चर्चा करत नाही .निसर्गोपचारेचे हि ह्या तत्वतेच वेगवेगळे प्रयोग मात्र शुद्धतेने व बारकावणे करून त्याचा उपयोग आरोग्यासाठी केला जातो .गावागावातून चालणारे समाज ,सुधारकांचे कार्यक्रम ,असे कीर्तन, प्रवचन ,कथा ,यातून वेळोवेळी आपल्या जीवनाचे रहस्य सांगतात
सकाळी लवकर उठावे भोजन साधे व शुद्ध करीत जावे खेळण्यांमध्ये व कुस्त्यांचे फडात भाग घावा ,उपवास करत जावे असे लोक चर्चेतूनही लोकांना सांगतात अलीकडे काही प्रात्यक्षिक प्रयोग ,जसे स्टीमबाथ, एनिमा , कटिस्नान ,चिखलचा वापर ,मसाज ,हे प्रयोग पुढे आले आहेत ,मोठ्या शहरातून निसर्गोपचार घेण्याची व्यवस्था हि वाढत आहे मात्र हे प्रयोग ग्रामीण भागात व्हावेत याकडे अद्याप कोणी लक्ष देत नाही ,सुक्षितीत ,युवक ,युवतीने ,योग्य निसर्गोपचारची माहिती घेऊन गाव तेथे निसार्गोपचार केंद्र चालवावे ,यासाठी कुठलेही कायद्यची अडचण नाही